एसीपी ढोबळेंच्या कारवाईमुळे 17 मुलांची सुटका

June 28, 2012 5:03 PM0 commentsViews: 3

28 जून

पब्ज आणि बारवरच्या कारवाईमुळे वादात सापडलेले एसीपी वसंत ढोबळे यांचा धडाका सुरूच आहे. शिवाजी नगरमधल्या बैगनवाडी इथं हॉटेल आणि बेकरीवर आज मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापे टाकले. आणि तिथं काम करणार्‍या 17 अल्पवयीन मुलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी 11 हॉटेल आणि बेकरी मालकांनाही ताब्यात घेतलंय. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. एसीपी ढोबळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती.

close