तटकरेंविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल

June 29, 2012 4:04 PM0 commentsViews: 40

29 जून

राज्याचे जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तटकरेंनी आपल्या नातेवाईकांच्या नावे 140 कंपन्या उघडल्या. आता तटकरेंच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांमध्ये पैशांच्या अफरातफरी झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. यासदर्भात किरीट सोमय्या यांनी आज सुनील तटकरे यांचे नातलग आणि त्यांच्या सहकार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पैशांची अफरातफर, फसवणूक करुन जमिनीची खरेदी, बेनामी व्यवहार आणि बंदी घातलेल्या कंपनीसोबत व्यवहार या सर्वांबद्दल यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त- आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांनी आज ही तक्रार दाखल केलेय. अनिकेत तटकरे संचालक असलेल्या मल्टीव्हेंचर ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सेबीने बंदी घातलेल्या यश ज्वेल्स या कंपनीसोबत व्यवहार केले. कंपनीच्या व्यवहारातून मिळणारा फायदा लपवण्यासाठी खोटे शेअर होल्डर तयार केले. किरण सारंगे, नम्रता मेलाग, मनोज शिंदे, श्रीधर गावडे, सत्यजित दळी, अनिकेत, आदिती वेदांती तटकरे यांच्या नावे या कंपन्या स्थापन करुन बेनामी व्यवहार केले. याची चौकशी करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

तटकरेंच्या कंपन्यांमध्ये अफरातफर ?

मल्टीव्हेंचर ऍग्रो & इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी- 20 मार्च 2009 : 1,75,000 शेअर्सची प्रत्येकी 100 रु. दरानं विक्री- 31 मार्च 2010 : सहयोगी कंपन्यांनी प्रत्येकी 10 रु. दरानं केली शेअर्सची खरेदी- शेअर होल्डर्सची नावं जाहीर करण्यात आली नाहीत- शेअर्स खरेदी-विक्रीमध्ये कंपन्यांना 3 कोटी रु. नफा (100 रु. शेअरची 10 रु.ना खरेदी)- 2009 : 4 कोटी 85 लाख 95 हजार 645 रु. कर्ज दिलं, पण कोणाला? – एवढं मोठं कर्ज दिल्यावरही व्याजाची रक्कम बॅलन्सशिटमध्ये का नाही?

मल्टीव्हेंचर इस्टेट्स प्रा. लि. – 10408 शेअर्सची प्रत्येकी 1806 रु. दरानं दोन शेअरहोल्डर्सना विक्री- कंपनीच्या पहिल्याच वर्षात इतक्या महाग दरानं शेअर्स कुणी खरेदीकेले?- स्थापनेच्या वेळी कंपनीचं भागभांडवल होतं 10 लाख रु.- स्थापनेच्या वेळेस अनिकेत आणि आदिती तटकरे हे दोघेच होते संचालक- 2 सप्टेंबर, 2008 : दोघांनीही दिला संचालकपदाचा राजीनामा- 1 सप्टेंबर, 2008 : गिरीष आमोणकर बनले कंपनीचे संचालक- बॅलन्सशिटमध्ये वार्षिक टर्नओव्हरचा रकाना रिकामाच- बॅलन्सशिटमध्ये सहयोगी कंपनी आहे विनम्र युनिव्हर्सल ट्रेडर्स प्रा. लि.

विनम्र युनिव्हर्सल ट्रेडर्स कंपनी प्रा. लि.- मल्टीव्हेंचर इस्टेट्स प्रा. लि. कंपनीमध्ये 46 % गुंतवणूक – विनम्रच्या बॅलन्सशिटमध्ये दाखवलेले आर्थिक व्यवहार संशयास्पद- कंपनीचं स्थापनावर्ष – 2008- स्थापनेच्या वेळी कंपनीचं भागभांडवल 1 लाख रु.- पहिल्याच वर्षात घेतलं 3,520 कोटीचं कर्ज – हे कर्ज विनातारण स्वरुपाचं- कर्जाचा स्त्रोत कंपनीने जाहीर केलेला नाही- एक लाख रु. भागभांडवलावर 3,520 कोटीचं कर्ज कसं मिळालं?- कर्जाची परतफेड, व्याजाचे हप्ते बॅलन्सशिटमध्ये नाहीत- 2009 : कंपनीने दाखवला 500 कोटींचा तोटा – तोटा होत असताना इतर कंपन्यांना जमीन खरेदी आणि गुंतवणुकीसाठी दिले पैसे- यापैकी एकाही कंपनीनं सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, ऍडव्हान्स टॅक्स भरल्याची माहिती बॅलन्सशिटमध्ये नाहीनेक्स्ट टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि.- 31 मार्च, 2006 : 1,90,575 शेअर्सची प्रत्येकी 390 रु. दरानं विक्री- 15 मे, 2010 : सर्व शेअर्सची प्रत्येकी 11 रू. दरानं केली खरेदी- ही शेअर्स खरेदी केली नेक्स्ट कंपनीच्याच 3 सहयोगी कंपन्यांनी – व्यवहारात नफा – 7 कोटी 43 लाख 24 हजार 250 रु. (390 रु. चा शेअर 11 रु. नं खरेदी केला)- सहयोगी कंपन्या : : मल्टीव्हेंचर फायनाशियल सव्हिर्सेस प्रा. लि. : मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रा. लि.: मल्टीव्हेंचर फिशरीज ऍण्ड मेरीटाईम प्रा. लि.ब्ल्यू फॉरेस्ट ऍग्रो इस्टेट प्रा. लि.- 86 लाख 89 हजार 550 रुपयांचं विनातारण कर्ज घेतलं- किरण केशव सारंगे : 2 वर्ष संचालकपदीृ- किरण सारंगे हा तटकरे यांच्या कामगाराचा मुलगा- कंपनीने घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी हप्ते भरल्याची माहिती ऑडिटमध्ये नाही- पैशांच्या देवाणघेवाणीसाठी केवळ कागदावर दाखवलं कर्ज?माझदा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.- 30 सप्टेंबर, 2011 : मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रा. लि. चे 500 शेअर्स – मल्टीव्हेंचर मध्ये अनिकेत तटकरे संचालकपदी- म्हणजेच माझदा कंपनीचं 33 % शेअरहोल्डींग अनिकेत यांच्या कंपनीकडे- माझदा कन्स्ट्रक्शनचा मुंबईत कंबाला हिल इथे ऑर्बिट ग्रुपच्या मदतीने पुनर्विकासाचा प्रकल्प सुरु- याच प्रकरणात किरीट सोमय्या यांनी केलेत आरोप- 50 हजार रु. गुंतवून 100 कोटी रु. नफा मिळवल्याचा आरोप

close