जेवण मागितल्यामुळे मुलीला अमानुष मारहाण

June 29, 2012 9:57 AM0 commentsViews: 7

29 जून

जेवण मागितल्याच्या कारणावरुन बाल सदन केंद्रातल्या 12 वर्षाच्या विद्यार्थीनीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण एवढी अमानुष आहे की तीन दिवसानंतरही या मुलीच्या पाठीवर आणि हातावरचे व्रण कायम आहेत. या प्रकरणी बाल सदन केंद्र संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीतल्या वसमत रस्त्यावर श्री शंकरराव बाल सदन केंद्रात हा प्रकार उघडकीला आला आहे. या बालगृहात तब्बल 140 मुलं-मुली कोंडवाड्यात राहतात. दोन दिवसांपूर्वी श्वेता लबडे या विद्यार्थीनीला वस्तीगृह चालक श्रीनिवास राठोड यानं अचानकपणे जेवण देण बंद केलं. दिवसभर उपाशी राहील्यानंतर रात्री या चिमुकलीनं जेवण मागितलं, यावर राठोड यानं तिच्या ओढणीनं हातपाय बांधून प्लॅस्टिक रॉडने श्वेताला मारहाण केली. आणि तिला शौचालयामध्ये कोंडून ठेवलं, या मुलीनं कशीबशी आपली सुटका करत पळ काढला. आणि रात्री गस्तीवरच्या पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या मुलीला परत सदन केंद्रात नेवून सोडलं. त्यानंतर चालकानं पुन्हा मारहाण केली.

close