हर्श मंदर,स्वामीनाथन, गाडगीळांना सल्लागार परिषदेमधून वगळले

June 30, 2012 11:05 AM0 commentsViews: 8

30 जून

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्षपदी असणार्‍या राष्ट्रीय सल्लागार परिषदेमधून हर्श मंदर, एम एस स्वामीनाथन आणि माधव गाडगीळ यांना वगळण्यात आले आहे. हे तिघाही सदस्यांनी अन्न सुरक्षा विधेयक आणि मायनिंगवर प्रश्न उपस्थित केले होते. पंतप्रधान कार्यालयाने दोन नव्या मिहिर शहा आणि आशिष मोंडल यांना राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये सहभागी करण्यात आले आहे. राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये 14 सदस्यांचा सहभाग असतो अनेक सदस्यांची शक्यतो पुन्हा नियुक्ती करण्यात येते. माजी आपीएस अधिकारी हर्ष मंदर यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आधी सुधारणा करण्याची मागणी केली होती. शास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांनीही अन्न सुरक्षा विधेयकावर टीका केली होती. तर माधव गाडगीळ यांनी पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या र्‍हासासंदर्भातील रिपोर्ट पर्यावरण खात्यानं न स्विकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

close