डॉ.सोमवंशीने 621 बेकायदेशीर गर्भपात केल्याचं उघड

June 29, 2012 8:25 AM0 commentsViews: 4

29 जून

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईमध्ये डॉ. नंदकिशोर सोमवंशीचा जामीन अंबाजोगाई कोर्टाने फेटाळला आहे. डॉ. सोमवंशीने 621 बेकायदेशीर गर्भापात केल्याचं रेकॉर्डच्या आधारे समोर आलंय. त्यापैकी 299 गर्भापातासंबंधी कुठलीही माहिती या रुग्णालयात मिळाली नाही, अशी माहिती सरकारी वकील ए. वी. कुलकर्णी यांनी कोर्टाला दिली. डॉ. सोमवंशीची पोलीस कोठडीत पुन्हा रवानगी करण्यात आली आहे. 12 जून रोजी डॉ. नंदकुमार सोमवंशी याला अटक करण्यात आली होती. सोमवंशीच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये एका मूकबधीर महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आलाय. ही महिला सहा महिन्याची गरोदर होती. तिसर्‍या महिन्यानंतर गर्भपात करणं बेकायदेशीर असतं. तरीसुध्दा सोमवंशी यांनी गर्भपात केला. पोलिसांनी याप्रकरणी एमटीपी कायद्यांतर्गत कारवाई करत डॉ. नंदकुमार सोमवंशी याला अटक केली होती.

close