छत्तीसगडमध्ये चकमकीत 16 नक्षलवादी ठार

June 29, 2012 10:30 AM0 commentsViews: 2

29 जून

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सीआरपीएफ (CRPF) जवानांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 16 नक्षलवादी ठार झालेत. तर या चकमकीत 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. दंतेवाड्‌यातील जंगलात रात्रभर ही चकमक सुरु होती. जगरगुंडा आणि बसगुंडा दरम्यान CRPF जवान नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवत असताना चकमक सुरु झाली. या ऑपरेशन दरम्यान, दोन नक्षलवाद्याना अटक करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेत. अटक केलेल्या नक्षलवाद्यांना हेलिकॉप्टरने रायपूरला हलवण्यात येणार आहे. सहा जखमी जवांनानाही हेलिकॉप्टरमार्गे मार्गे रायपूरला हलवण्यात आलंय. मृत नक्षलवाद्यांच्या संख्येत अजून वाढ होवू शकते असं अधिकायांनी म्हटलंय. यापुर्वी एप्रिल 2010 मध्ये याच परिसरात झालेल्या नक्षलवादी हल्यात 75 सीआरपीएफ जवान ठार झाले होते.

close