स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 5 खेळाडूंवर बंदी

June 30, 2012 1:08 PM0 commentsViews: 11

30 जून

आयपीएलच्या पाचव्या हंगामात स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने पाच खेळाडूंवर बंदीची कारवाई केली आहे. टी पी सुधींद्रवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. तर शलभ श्रीवास्तवला पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. याशिवाय अमित यादव, अभिनव यादव आणि मोहनिश मिश्रावर एक वर्षांची बंदी घालण्यात आलीय. एका न्यूज चॅनलनं केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये हा खुलासा झाला होता. या स्टिंगमध्ये आयपीएलसाठी स्पॉट फिक्सिंग केल्याचं थेट स्पष्ट होत नसलं तरी अनेक खेळाडूंनी लिलावात मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे अनधिकृतपणे मिळत असल्याचं कबूल होतं . यामुळे बीसीसीआयनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही कारवाई केली आहे.

गेली पाच वर्ष आयपीएलने क्रिकेटप्रेमींना जितकी भुरळ घातलीय. तितकेच वादही ओढवून घेतलेत आणि आता तर आयपीएलच्या पाचव्या हंगामात थेट फिक्सिंगचाच वाद निर्माण झाला. एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं सांगत एका चॅनेलने स्टिंग ऑपरेशन केलं. यात दोन खेळाडूंशी झालेल्या संवादानंतर आयपीएलमध्ये फिक्सिंग सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेक्कन चार्जर्सचा टी सुधींद्र आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा शलभ श्रीवास्तव या खेळाडूंनी अधिक रक्कम मिळाल्यास दुसर्‍या टीममध्ये जाण्याची तयारी दर्शवली. करारानुसार मान्य झालेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम ब्लॅकमनी मिळाल्याची कबुलीसुध्द यामध्ये खेळाडूंनी दिली आहे.

रणजी क्रिकेट स्पर्धेत गेल्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा टी सुधींद्रचं संभाषण या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आलं आहे. मॅचमध्ये एक नो बॉल टाकण्याचा रेट 50 हजार असल्याचं या संभाषणात दाखवण्यात आलं आहे. सुधींद्र या हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळत असून इंदूर इथं झालेल्या एका मॅचमध्ये त्यानं स्पॉट फिक्सिंग केलं होतं.

स्पॉट फिक्सिंग प्रकरण 5 खेळाडू

टी. सुधींद्र – डेक्कन चार्जर्समोहनीश मिश्रा – पुणे वॉरियर्सशलभ श्रीवास्तव – किंग्ज इलेव्हन पंजाबअमित यादव – किंग्ज इलेव्हन पंजाब

सुधींद्र हा सध्या डेक्कन चार्जर्सशी करारबद्ध आहे. मोहनीश मिश्रा हा पुणे वॉरिअर्सशी तर शलभ श्रीवास्तव आणि अमित यादव किंग्ज इलेव्हन पंजाबशी करारबद्ध आहेत. अभिनव बाली हा आयपीएलमधील खेळाडू नसून तो हिमाचल प्रदेशच्या रणजी टीमचा सदस्य आहे.

close