आता बाऊन्सर्सवर पोलिसांची करडी नजर

June 30, 2012 5:26 PM0 commentsViews: 8

29 जून

बार , डिस्को थेक पाठोपाठ आता त्या ठिकाणी काम करणार्‍या बाऊन्सर्ससवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. काही ठिकाणी बाऊन्सर्स च्या नावाखाली गुंडाचा वापर होत असल्याचं लक्षात आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनायक यांनी आदेश दिले आहे. त्यामुळे यापुढे पब, बार तसेच बिल्डर सोबत वावरणार्‍या बाऊन्सर्सवर लक्ष ठेवण्याचे तसेेच त्यांचे रेकॉर्ड तयार करण्याच आदेश देण्यात आले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानंतर समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांच्यानेतृत्वाखाली पब,डिस्को,बार यांच्यावर कारवाई सुरु आहे. समाजसेवा शाखेने आता पर्यंत कारवाई करुन शेकडो गुन्हे दाखल केले आहेत. तर त्या गुन्ह्यात शेकडो बार मालकांना, बाऊन्सर्संना अटक केलीय. या कारवाईच्या पुढील तपासत अनेक बाऊन्सर्स हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचं त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलंय. तसेच गुंड प्रवृत्तीच्या या बाऊन्सर्सचा वापर पद्धतशीर पणे सुरु असल्याचं पोलीस आयुक्तांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे यापुढे या बाऊन्सर्सवर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा बनवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

या बाबत पोलीस आयुक्तांनी एक परिपत्रकच काढलं आहे. या परिपत्रात सविस्तरपणे आदेश व्यक्त केले आहे. समाजसेवा शाखेेच्या कारवाईत तसेच पोलीस आयुक्तांकडेे येत असल्यालेेल्या तक्रारीचा अभ्यास करुन पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या या बाऊन्सर्सस वापर अनेक ठिकाणी होत आहे. बिल्डरही मोठ्या प्रमाणात या बाऊर्ससचा वापर करत आहेत. जागा खाली करुन घेण्यासाठी अंगरक्षक म्हणून तसेच साईट सुरु असलेल्या ठिकाणी सुपरवाझर म्हणून ही या बाऊन्सर्ससचा वापर बिल्डर करत असल्याने बिल्डरांसाठी काम करणार्‍या बाऊन्सर्ससचीम माहिती गोळा करण्याचे आदेश ही पोलीस आयुक्तानी दिले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या बाऊन्सर्ससचा वापर काही प्रमाणात बँकाही करत असल्याची माहिती तपासात उघड झाल्याने त्याबाबतही कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

close