मोनिका बेदी माझी बायको आहे – अबु सालेम

November 26, 2008 5:32 AM0 commentsViews: 149

26 नोव्हेंबर, सुरत''मोनिका बेदी माझी बायको आहे'' असं अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमनं पुन्हा एकदा म्हटलंय. एका खंडणीप्रकरणाच्या सुनावणीसाठी सालेमला मुंबईहून दिल्लीला नेण्यात आलं. त्यावेळी प्रवासात सुरत इथं पत्रकारांशी बोलताना त्यानं हा उल्लेख केला. 'आपलं लग्न झालेलं नाही' असं मोनिका बेदी नेहमीच सांगते. त्यामुळं आता त्यांच्या या लग्नाची चर्चा चांगलीच रंगणार आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात सालेमवरच्या खंडणी प्रकरणाची 26 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

close