तुळजाभवानी मंदिर:सोने-चांदी घोटाळ्याची सीआयडी चौकशी

June 30, 2012 8:12 AM0 commentsViews: 68

30 जून

तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पेटीतील सोने – चांदी घोटाळ्याप्रकरणी आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या वीस वर्षापासून तुळजाभवना मंदिरात दान केलेल्या सोने चांदीच्या वस्तूंची चौकशी करण्याची मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. पुजार्‍यांची दखल घेत येत्या दोन दिवसात सीआयडीची कारवाई सुरु होणार आहे.

close