निधीअभावी चारा डेपोत तीव्र टंचाई

June 30, 2012 3:19 PM0 commentsViews: 5

30 जून

जून महिना आज संपतोय पण पावसाने पाठ फिरवलेल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. पाऊस लाबल्यानं मंत्रिमंडळानं टंचाईच्या उपायांमध्ये आणि निधीत वाढ केली. पण प्रत्यक्षात यातली फारच थोडी मदत पोहोचतेय. नाशिक जिल्ह्यातला सर्वात दुष्काळी तालुका असलेल्या सिन्नरमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून बाजार समितीतर्फे गुरांची छावणी सुरू आहे. 3 हजार गुरांच्या चारा-पाण्यासाठी या ठिकाणी दररोज सरासरी 2 लाख रुपये खर्च करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांची ही बिलं 80 लाखात गेली. पण सरकारकडून फक्त 15 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी चारा-पाण्याची तीव्र टंचाई जाणवतेय.

close