बीडमध्ये 5 संशयितांना अटक

June 30, 2012 3:25 PM0 commentsViews: 3

30 जून

मुंबईवर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अबू जुंदालच्या अटकेनंतर बीडमध्ये आज कारवाई करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या पोखरी गावातून 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गेवराई पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या 5 जणांपैकी 3 जण उत्तर प्रदेशातील आहेत आणि हे तीनही जण मदरशात काम करतात. कलीम अली, जियाउल हक आणि मोहम्मद अदनान अशी या 3 जणांची नावं आहेत. तर अन्य दोन जण हे गेवराई तालुक्यातलेच आहेत. शेख जफर आणि नुजत नियामतयात जाफर अशी त्यांची नावं आहेत. पोखरीतल्या एका पडक्या घरात हे सर्वजण राहत होते. या सर्वांना 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

close