विम्बल्डन : सानिया-भूपती जोडी पराभूत

June 30, 2012 4:22 PM0 commentsViews: 10

30 जून

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि महेश भूपती जोडीला पराभवाचा धक्का बसला आहे. दुसर्‍या फेरीत हेनली-कुद्रेत्सेवा जोडीने त्यांचा 6-3 आणि 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. विशेष म्हणजे सानिया-भूपती जोडीला 5 सिडींग होतं. तर हेनली-कुद्रेत्सेवा जोडी अनसिडेड आहे. मिक्स डबल्समध्ये सानिया मिर्झाचा पराभव झाला असला तरी महिला डबल्समध्ये तीचं आव्हान कायम आहे.. बेथनी मॅटेकच्या साथीनं तीनं तिसर्‍या फेरीत प्रवेश केलाय. तर मेन्स डबल्समध्ये भूपती-बोपन्ना जोडीचं आव्हानही कायम आहे.

close