अहवाल न वाचता केलेली टीका दुदैर्वी – गाडगीळ

June 30, 2012 4:26 PM0 commentsViews: 20

30 जून

पश्चिम घाटाबाबत दिलेला अहवाल न वाचता नेते आणि अधिकारी यांनी केलीली टीका आणि केलेली वक्तव्य दुदैर्वी असल्याचं मत या समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलंय. 5 जुलैपर्यंत या अहवालावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अहवाल पोहोचवला पाहिजे. आपल्याला राष्ट्रीय सल्लागार परिषदेतून वगळल्याबद्दल आपली काहीही तक्रार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोकणात येत असलेल्या अनेक प्रकल्पांमधून पर्यावरणाला धोका असल्यानं स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असंही गाडगीळ यांनी जाहीर केलं.

close