तापमान वाढल्यानं चांद्रयानाला धोका

November 26, 2008 5:39 AM0 commentsViews: 1

26 नोव्हेंबरचांद्रयानच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीनंतर पहिल्यांदाच त्यात समस्या निर्माण झाली आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे चांद्रयान दहा डिगरी सेल्सियसनं गरम झालंय. त्यामुळे त्यातल्या उपकरणांवर परिणाम होण्याची भीती असल्याचं इस्रोचे अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी सांगितलं. चांद्रयानाच्या नेमका कुठल्या भागावर परिणाम झालाय, हे अजून स्पष्ट झालं नसल्याचे ते म्हणाले. तापमान कमी करण्यासाठी चांद्रयानभोवती असलेल्या थर्मल ब्लँकेटचा वापर केला जाऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

close