येडियुरप्पांचे पुन्हा बंड, ‘गौडांना हटवा’

June 30, 2012 5:02 PM0 commentsViews: 2

30 जून

कर्नाटकातलं नाटक सध्या दिल्लीत पोहोचलंय. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी सध्येचे मुख्यमंत्री सदानंदा गौडा यांना हटवण्याची मागणी केली आहे. यावर आता भाजपची संसदीय समिती अंतिम निर्णय घेणार आहे. येडियुरप्पांनी त्यांचे समर्थक जगदीश शेट्टार यांना कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. गौडा यांना हटवण्याप्रकरणी कर्नाटकातल्या 9 मंत्र्यांनी याअगोदर राजीनामे दिले आहेत. पण आज मुख्यमंत्री सदानंदा गौडा यांनी हे राजीनामे नाकारले. त्यामुळे कर्नाटकातला वाद हा आता दिल्लीत सोडवला जाणार आहे.

close