आसामच्या आमदार रुमी नाथ यांना मारहाण

June 30, 2012 5:04 PM0 commentsViews: 2

30 जून

आसामच्या काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ आणि त्यांचे दुसरे पती झाकीर हुसेन यांना शुक्रवारी रात्री मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेल्या करीमगंज भागात सध्या तणावाचं वातावरण आहे. रुमी नाथ यांच्या वैयक्तीक आयुष्यावरुन सध्या अनेक वाद सुरु आहेत. त्यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यात भर पडली आहे. रुमी नाथ यांनी इस्लाम धर्म स्विकारल्यामुळे अनेक संघटना त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतंय.

close