पवारांचा टेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

July 2, 2012 4:31 PM0 commentsViews: 2

02 जुलै

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी टेलिकॉमविषयक मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहून कळवलंय. पंतप्रधान राजीनामा स्वीकारणार आहेत, असंही पवारांनी सांगितलंय. 2 जी संदर्भात आपल्यावर झालेल्या आरोपांमुळेच मी हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं पवार म्हणाले. प्रणव मुखर्जी यांनी या मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पवारांकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हा मंत्रीगट 3 जीचे दर आणि 2 जी संदर्भात सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली लिलावाची प्रक्रिया ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. पवारांनी राजीनामा दिल्याने मंत्रिगटाची होणारी आजची बैठक रद्द झाली.