नांदेडमध्ये गर्भपात प्रकरण उघडकीस, डॉक्टर फरार

July 2, 2012 9:32 AM0 commentsViews: 8

02 जूलै

बीड, जळगाव, सोलापूरनंतर आता गर्भपाताचे प्रकरण नांदेडमध्ये उघडकीस आलंय. नांदेडला महावीर सोसायटीत असलेल्या राधिका हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉ. मंगला देशमुख यांनी दोन महिलांचा गर्भपात केल्याचं सिव्हिल सर्जनच्या तपासणीत उघडकीस आलंय. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गर्भपाताबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर डॉ. देशमुख फरार झाल्या आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले, असे दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात राजकीय दबावापोटी पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत अशी चिन्ह दिसत आहे.

close