मुखर्जी लाभाचं पद भूषवत आहे – संगमा

July 2, 2012 4:42 PM0 commentsViews: 3

02 जुलै

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार पी. ए. संगमा यांच्या टीमने प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीलाच आव्हान दिलंय. मुखर्जी कोलकत्यातल्या इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टिट्यूचे प्रमुख आहेत. हे लाभाचं पद आहे. त्यामुळे ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढू शकत नाही असा आरोप संगमांच्या सहकार्‍यांनी केला आहे. पण मुखर्जी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठवडाभरपूर्वीच संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलंय. दरम्यान, या आरोपानंतर मुखर्जी यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. राज्यसभेच्या सरचिटणीसांसमोर उद्या या आरोपाची शहानिशा केली जाईल.

close