नाशिकमध्ये स्फोट करण्याचा अबूचा होता कट

July 3, 2012 10:14 AM0 commentsViews: 5

03 जुलै

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अतिरेकी अबू जुंदल आता चौकशी दरम्यान एकेक गौप्यस्फोट करु लागला आहे. आता त्यानं एक धक्कादायक माहिती दिली. अबू जुंदलला अटक झाल्यानं नाशिकमध्ये मोठा अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला गेला आहे. मुंबईनंतर नाशिक हे अतिरेक्यांचं लक्ष्य होतं याची कबुली अबू जुंदलनं दिली. नाशिक पोलीस अकादमीवर हल्ला करण्याचा आपला कट होता असंही त्यांनी सांगितलंय. लाहोरमध्ये तालिबानच्या अतिरेक्यांनी पोलीस अकादमीवर केलेल्या हल्ल्यानंतर नाशिकमध्ये असा हल्ला करण्याचा निर्णय आपण घेतल्याचं जुंदलनं कबुल केलंय. पण जर्मन बेकरी स्फोटानंतर धरपकड झाल्यानं तेव्हा नाशिकमध्ये स्फोट करण्याचा कट उधळला गेला. पण त्यानंतरही आपण हा कट रचत होतो, पण त्याआधीच भारतात अटक झाल्यानं जुंदलचा हा कट उधळला गेला. अशी कबूली अबू जुंदलनं दिली आहे.

दरम्यान, अबू जुंदाल उर्फ जबिउद्दीन अन्सारी याला नाशिक कोर्टात हजर करावं असे आदेश नाशिकच्या सत्र न्यायालयानं दिले आहे. दहशतवाद विरोधी पथकानं त्यासाठी नाशिक कोर्टात अर्ज केला होता. 2 वर्षांपूर्वी डिसेंबर 2010 मध्ये नाशिकमध्ये बिलाल उर्फ लालबाबा शेख याला अटक करण्यात आली होती. जर्मन बेकरी स्फोटातला आरोपी हिमायत बेग याच्यासोबत बिलालनं आणि अन्सारीनं नाशिकमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अन्सारी तिसरा फरार आरोपी आहे.

close