युरो कप स्पर्धेत स्पेन चॅम्पियन

July 2, 2012 10:39 AM0 commentsViews: 1

02 जूलै

स्पेननं युरो फुटबॉल कप स्पर्धा सलग दुसर्‍यांदा जिंकण्याचा विक्रम केला आहे. मॅचच्या चौदाव्या मिनिटालाच सिल्वानं स्पेनला आघाडी मिळवून दिली. चौतीसाव्या मिनिटाला अल्बानं गोल करीत ही आघाडी 2-0 अशी केली. इटलीने ही आघाडी कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण स्पेनचा गोलरकिपर कॅसिलसचा बचाव त्यांना भेदता आला नाही. सेंकड हाफमध्ये टोरेस आणि मॅटने गोल करीत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॅसिलिसच्या नेतृत्वाखाली स्पेनने यापूर्वी 2008 साली युरो स्पर्धा तर 2010 ला वर्ल्ड कप जिंकलाय. स्पेनचे हे तिसरे युरो विजेतेपद आहे. यापूर्वी 1964 साली त्यांनी पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते.

close