कमी पावसामुळे यंदा पेरण्या कमी झाल्यात – पवार

July 3, 2012 10:40 AM0 commentsViews: 2

03 जुलै

यंदा पाऊस उशिरा आला असल्यानं पेरण्यांचं प्रमाण कमी झालंय. पण उत्पादनावर त्याचा परिणाम होणार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. कडधान्याची 9 टक्के प्, कपाशीची 27 टक्के पेरणी आटोपली आहे. दुष्काळावर बोलणं आता फार लवकर होईल. पण दुबार पेरणी संदर्भात राज्य सरकारनं बियाणांची तरतूद केली आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेशाला फटका बसला आहे. पण पुढच्या काही दिवसात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्याची माहितीही पवारांनी दिली.

close