प्रणवदांचा उमेदवारीचा अर्ज स्विकारला

July 3, 2012 4:33 PM0 commentsViews: 6

03 जुलै

युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांचा उमेदवारी अर्ज अखेर स्विकारण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदाचे दुसरे उमेदवार पी.ए.संगमा यांनी मुखर्जी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. पण हे आक्षेप सध्या फेटाळण्यात आलेत. प्रणव मुखर्जी यांनी कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. हे लाभाचं पद आहे असा आरोप संगमांच्या गटानं केला होता. पण प्रणव मुखर्जी यांनी या पदाचा राजीनामा दिल्याचं आता सांगितलं जातंय. प्रणवदांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोपही आता भाजपने केला. पण प्रणव मुखर्जी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं प्रणवदांनी म्हटलंय.

close