‘युपीत आमदारनिधीतून कार खरेदीसाठी सूट’

July 3, 2012 4:46 PM0 commentsViews: 5

03 जुलै

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नव्या निर्णयामुळे सध्या चांगलाच वाद रंगला आहे. प्रत्येक आमदाराला मिळणार्‍या मतदारसंघ विकास निधीचा वापर खाजगी कामासाठी करण्याची मुभा त्यांनी दिली. प्रत्येक आमदाराला मतदारसंघाच्या विकासासाठी दर पाच वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. त्यापैकी 20 लाख रुपये आमदार स्वत:साठी गाडी खरेदीसाठी वापरू शकतात, असा आदेश अखिलेश यादव यांनी दिला. बहुजन समाज पक्ष आणि भाजपनं मात्र या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

close