ज्येष्ठ स्वतंत्रसेनानी जवाहरलाल दर्डांना श्रद्धांजली

November 26, 2008 8:35 AM0 commentsViews: 1

26 नोव्हेंबर, यवतमाळ प्रशांत कोरटकर ज्येष्ठ स्वतंत्रसेनानी जवाहरलाल दर्डा यांची अकरावी पुण्यतिथी यवतमाळमध्ये साजरी करण्यात आली. या निमित्तानं यवतमाळ इथल्या प्रेरणास्थळ या त्यांच्या समाधीस्थळावर श्रध्दांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या श्रध्दाजंली कार्यक्रमात खासदार विजय दर्डा, आमदार राजेन्द्र दर्डा, देवेन्द्र दर्डा आणि यवतमाळ जिल्हातले गणमान्य उपस्थीत होते. यावेळी अरुण हळबे यांनी लिहिलेल्या ' शतकातील यवतमाळ ' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यतिथीच्या निमीत्तानं स्वरश्रध्दांजली कार्यक्रमात, पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम, तर अमेरिकन निवासी कोलीना शक्ती यांच्या शास्रीय नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

close