बेळगाव पालिकेवर पुन्हा कानडी वरवंटा

July 3, 2012 12:20 PM0 commentsViews: 4

03 जुलै

कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष सुरूच आहे. मराठी महापौर आणि महापौर असलेली बेळगावची महापालिका पुन्हा बरखास्त करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहे. याआधीही बेळगावची हीच महापालिका बरखास्त करण्याच्या कर्नाटक सरकाराचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला होता. बेळगावच्या माजी महापौर रेणू किल्लेकर यांनी या आदेशाला पुन्हा हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं सांगितलं.

मागिल महिन्यात 19 जूनला बेळगाव महानगरपालिकेला कोर्टाने दिलासा दिला होता 15 डिसेंबर 2011 ला कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा आदेशाला कर्नाटक उच्च न्यायलयाने रद्दबातल ठरवला होता. बेळगाव महानगपालिकेतील सर्व 57 नगरसेवकांना 25 जूनला बेळगाव महापालिका सभागृहात बाजू मांडायची संधी द्या आणि मग निर्णय घ्या असे आदेश हायकोर्टाने दिले होते. कर्नाटक सरकारने पालिका बरखास्त केल्यानंतर नगरसेवक संजय प्रभू आणि दिपक वाघेला यांनी उच्च न्यायलयात कर्नाटक सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. 1 नोव्हेंबर हा कर्नाटकमध्ये काळा दिवस म्हणून पाळला जातो पण महापौर आणि उपमहापौर यांनी सहभाग घेतल्यामुळे पालिका बरखास्त करण्यात आली होती.

close