पुरात क्वालिस वाहून गेल्यानं 7 जणांना जलसमाधी

July 4, 2012 10:08 AM0 commentsViews: 2

04 जुलै

सोलापूर-बार्शी रोडवर असलेल्या सौंदर्य पुलावरून काल मंगळवारी पुराच्या पाण्यात एक क्वालिस गाडी वाहून गेली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 महिला, 2 पुरुष आणि 2 जुळ्या बहिणींचा समावेशआहे. सविता अंगडी, शांतीलाल गांधी, जतीन धरमसी, अंजली धरमसी, भाविका लोढीया, दिया धरमसी आणि दिशा धरमसी अशी त्यांची नावं आहेत. गाडीत एकूण 11 प्रवासी होते. त्यापैकी उरलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.

close