वरुणराजाला साकडं, बैलपोळा साजरा

July 4, 2012 7:38 AM0 commentsViews: 90

04 जुलै

पश्चिम महाराष्ट्रात पावसानं दडी मारल्यानं शेतक-यांच्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. माणदेशी भागाला गेल्या अनेक वर्षांपासून तोंड द्यावं लागतंय. पण याही परिस्थितीत शेतकर्‍यांनी बैंदुर अर्थात बैलपोळा साजरा केला. या भागात पडलेल्या दुष्काळामुळे शेतक-यांनी जनावरं चारा छावण्यांमध्ये आणली आहेत. म्हसवडला माणदेशी फाऊंडेशनच्या या छावणीत सध्या 12 ते 13 हजार जनावरं आहेत. दुष्काळाच्या तीव्र झळा,पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती असली तरी शेतकर्‍यांनी बैंदुर साजरा केला. या छावणीतील 4 हजार बैलांना सजवून गावाच्या वेशीवर असलेल्या सिध्दनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यांनी पावसासाठी साकडं घातलं.

close