प्राध्यपकांनी केला पत्नी, मुलीचा खून

July 3, 2012 2:16 PM0 commentsViews: 3

03 जुलै

ठाण्यातील बाळकुम परिसरातील वर्धमान गार्डन या इमारतीत सातव्या मजल्यावर राहणार्‍या संजय उंबरकर या प्राध्यापकाने आपली पत्नी आणि 12 वर्षाच्या मुलीचा चाकुचे वार करुन खून केला. चौदा वर्षांचा मुलगा मात्र त्याच्या तावडीतून सुटून पळाल्यामुळे वाचला. त्यानंतर संजय उंबरकरने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. स्वाती उंबरकर ह्या देखील शिक्षिका होत्या. घरात झालेल्या भांडणामुळे संजय उंबरकर यांनी हे खून केले अशी माहिती पोलिसांनी सध्या दिलेली आहे, पण याबद्दल आणखी तपास पोलीस करत आहे.

close