”आदर्श’ सीबीआय चौकशी नको’

July 3, 2012 2:43 PM0 commentsViews: 2

03 जुलै

आदर्श सोसायटी प्रकरणी राज्य सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात सोसायटीचीही जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. आयोगानेही जमीन राज्य सरकारची असल्याचं शिक्कामोर्तब केला आहे. पुन्हा एकदा सीबीआयच्या तपासाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करत जमीन राज्य सरकारच्या मालकीची असल्यानं चौकशीचे अधिकार राज्य सरकारचे आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी नको अशी मागणी उपसचिव रुपराव देशमुख यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केली आहे. उद्या या प्रकरणी सुनावणी होणार आहे. सीबीआय याप्रकरणी उद्या आरोपपत्र दाखल करण्याच्या शक्यता होती मात्र त्याअगोदरच राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलंय.

close