मंत्रालयाच्या आगीत 2000 कर्मचार्‍यांचा सर्व्हिस रेकॉर्ड खाक

July 3, 2012 4:21 PM0 commentsViews: 1

03 जुलै

21 जूनला लागलेल्या मंत्रालयातल्या आगीत मंत्रालयातली जवळपास 2000 कर्मचार्‍यांची सर्व्हिस रेकॉर्डस जळाली आहेत. महसूल, नियोजन आणि सामान्य प्रशासन या तीन विभागांच्या कर्मचार्‍यांची सर्व्हिस रेकॉर्डस आगीत भस्मसात झालीत. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची सगळी माहिती नष्ट झालीय. कर्मचार्‍यांचा सीआर, प्रॉव्हिडंच फंड, डिपार्टमंटल एन्क्वायरी, त्यांच्या कार्यकाळात झालेली शिक्षा, पेमेंट स्केल, इन्क्रीमेंट रेकॉर्ड हे सगळं नाहिसं झालंय. रिटायर होताना त्यांना जी थकबाकी मिळेल त्यात अडचणी येणार आहेत. यावर सरकार काही करणार आहे का असा प्रश्न राजपत्रित सरकारी महासंघाने विचारला आहे.

close