डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात आंदोलन बंदी

July 4, 2012 5:32 PM0 commentsViews: 40

04 जुलै

चळवळीचं केंद्र मानल्या जाणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात आंदोलन करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. विद्यापिठात आंदोलनावर बंदी घालण्याचा निर्णय औरंगाबाद विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने घेतला आहे. याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी संघटनांना नोटीसही पाठवण्यात आली. पण विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिलाय. दरम्यान याबाबत कुठलीही प्रतिक्रीया द्यायला कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांनी नकार दिला आहे.

close