पिंपरीत मुरुम चोरी ; पाईपलाईन पूर्णपणे उद्धवस्त

July 3, 2012 4:24 PM0 commentsViews: 26

03 जुलै

पिंपरीतल्या मोशी गावा शेजारी शेकडो एकर पसरलेल्या एका भूखंडाकडे महापालिकेचं दुर्लक्ष झालंय. नवनगर विकास प्राधिकरण राबवत असलेल्या इको हाऊसिंग सोसायटीच्या जागेत शेकडो टन मुरुम चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सोसायटीसाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्चून टाकलेली पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईनही मुरुम चोरांनी पूर्णपणे उद्धवस्त केली आहे. मध्यरात्री सशस्त्र गुंडांच्या पाहार्‍यात आणि महसूल आणि प्राधिकरण अधिकार्‍यांच्या संगनमताने ही मुरुम चोरी होत असल्याचा आरोप होतोय. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी करु आणि पाहू अशी उत्तरं दिलीयत, पण याची जबाबदारी घ्याला कुणीही तयार नाही.

close