एफडीआयचा निर्णय येत्या अधिवेशनात ?

July 4, 2012 5:49 PM0 commentsViews: 2

04 जुलै

रिटेल उद्योगातील विदेशी गुंतवणुकीचा – एफडीआय चा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनात घेतला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून ते आर्थिक सुधारणांच्या बाबतीत अधिक आग्रही झाले आहेत. यातूनच, आधी काँग्रेस शासित राज्यांमध्ये हा निर्णय लागू करून घ्यायचा आणि मग, इतर राज्यांना कलाकलाने या निर्णयासाठी प्रवृत्त करायचे अशी योजना पंतप्रधान आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत याबद्दलचे विधेयक मांडण्या आधीच व्यापक राजकीय सहमतीसाठीही केंद्र सरकार आणि काँग्रेस प्रयत्न करत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळालीय. येत्या काही दिवसांत देशभरातील शेतकरी संघटनांचे प्रतिनीधी, घाऊक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी वाणिज्य मंत्री आनंद शर्मा चर्चा करणार असल्याची माहितीही मिळतेय.

close