‘क्रीडा महोत्सवा’साठी लंडन सज्ज

July 5, 2012 1:22 PM0 commentsViews: 6

05 जुलै

आजपासून बरोबर 23 दिवसांनी लंडनमध्ये ऑलिम्पिकच्या क्रीडा महोत्सवाला सुरूवात होणार आहे. ऑलिम्पिक आयोजनाची लंडनची ही आजवरची तिसरी वेळ आहे. त्यामुळे ही हॅट्‌ट्रीक दिमाखात साधण्यासाठी लंडन सज्ज झालंय. आणि हो, या मोहिमेचं नेतृत्व करतोय तो ब्रिटनचा महान खेळाडू सॅबेस्टियन को..

लंडन ऑलिम्पिकच्या भव्यतेची साक्ष देणारी ही दृष्य..ऑलिम्पिक स्टेडियमच्या या विहंगम दृष्यातून संयोजनातील भव्यतेचा अंदाज येऊ शकतो. या थक्क करणार्‍या दृष्याच्या निर्मिती मागे हजारो हात झटले आहेत. केवळ स्टेडियमचं नव्हे तर अवघं लंडन शहरही या महासोहळ्यासाठी सज्ज झालेत. 200 देशातील 10500 खेळाडू, 5000 पदाधिकारी आणि 20,000 मीडियाचे सदस्य लंडनमध्ये दाखल होणार आहेत. सोबतीला जगभरातील लाखो दर्शकांची वर्दळ असेल ती वेगळीच. 17 दिवस चालणार्‍या या महाक्रीडा महोत्सवात विविध 32 स्टेडियमवर 26 क्रीडा स्पर्धांचं थरार रंगणार आहे. संयोजक सेबॅस्टियन को म्हणतात, जगाची आमच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहतोय. आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष जॅक रॉज यांनी मला म्हटलं होतं की लंडन शहराच्या क्षमतेचा 10 टक्के जरी आम्ही वापर करू शकलो तरी ही स्पर्धा अविस्मरणीय होऊ शकेल.

ऐतिहासिक लॉर्डस् क्रिकेट मैदानावर क्रिकेटएवेजी तिरंदाजीच्या स्पर्धा रंगणार आहेत. त्याचसोबत जलतरण तलाव, बास्केट बॉल स्टेडियम, सायकलचा वेलोड्रोम, आणि हो खेळाडूंसाठीचं क्रीडाग्रामही अगदी हायटेक झालंय. इतकचं नव्हे तर या स्टेडियमभोवतीचा बंदोबस्तही कडेकोट आहे. कारण लंडनशहराला ऑलिम्पिकचं आयोजन बहाल करण्याचा निर्णय 2003 साली घोषित झाल्यावर 24 तासाच्या आतचं लंडन शहरातील मेट्रो बॉम्बस्फोटांनी हादरल्या होत्या. त्यामुळे यंदा बंदोबस्त हा कडेकोटचं असणार आहे.

'लंडन ऑलिम्पिकसाठी इंग्लंडच्या सर्व 19 सुरक्षा व्यवस्था एकत्र आल्यात. मी त्याचा तपशिल देऊ शकत नाही. पण बंदोबस्त चोख असेल याची खात्री मी तुम्हाला देतो' अशी ग्वाही सेबॅस्टियन को यांनी दिली

बंदोबस्त कडेकोट असला तरी ऑलिम्पिक मोकळ्या आणि आनंदादायी होणार याची खात्री संयोजकांनी दिलीय. आतापर्यंत तरी सगळी तयारी सुरळीत पार पडलीय एवढं मात्र नक्की. तब्बल 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर ज्या स्पर्धेवर खर्च होतात ती स्पर्धा भव्य दिव्य होणारचं याबाबत काही शंका नाही.. आणि म्हणूनचं 2012 च्या लंडन ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज व्हा अशी प्रेमळ साद संयोजकांनीही जगभरातील क्रीडाप्रेमींना घातलीय.

close