नाशिकमध्ये फायर सेफ्टीच्या नावाखाली लायसन्स राज सुरू

July 5, 2012 10:36 AM0 commentsViews: 1

05 जुलै

फायर ऑडिट आणि फायर सेफ्टीच्या नावाने नाशिकमध्ये लायसन्स राज सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. 5 मजली बिल्डिंगसाठी किमान 5 लाखांची फायर सेफ्टीची इक्विपमेंटस बसवावी लागतात. हे काम करणार्‍या महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचं लायसन्स असणार्‍या 5-6 एजन्सीज नाशिकमध्ये आहेत. मात्र, महापालिकेचं लायसन्स फक्त एकाच एजन्सीकडे आहे. त्यामुळे त्याच एजन्सीकडून फायर ऑडिट आणि फायर सेफ्टीच्या उपाययोजना करण्याचं दडपण येत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्याचं लायसन्स असल्यावर महापालिकेचं स्वतंत्र लायसन्स काढण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केला जातोय. लायसन्य राजमुळे नाशिकमधले व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

close