साईंच्या चरणी 4 कोटी रुपये दान

July 5, 2012 3:12 PM0 commentsViews: 27

05 जुलै

शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात साईभक्तांनी तब्बल चार कोटी पंधरा लाख रुपये दान म्हणून दिले आहेत. गुरुपोर्णिमेला आपल्या गुरुला काहीतरी दान देण्याची हजारो वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. साईबाबांना गुरु मानणार्‍या भक्तांनी दानपेटीत 2 कोटी 62 लाख, डोनेशन काऊंटरवर 63 लाख रुपये, सोने 750 ग्रॅम, चांदी 5 किलो आणि याचबरोबर 31 देशांचे विदेशी चलन असे एकूण 4 कोटी 15 लाख रुपये तीन दिवसात दान केले आहेत. विशेष म्हणजे परदेशी चलनातील दानामध्ये यावर्षी मोठी वाढ झालेली आहे. गेल्या एका वर्षामध्ये तब्बल 4 कोटी 30 लाख रुपये परदेशी भक्तांनी दान केले आहेत. काल सकाळपासून दान दिलेल्या रकमेची मोजदाद सुरु होती.

close