शिक्षण मतदारसंघात पराभवामुळे ‘कमळ’ कोमजले

July 5, 2012 10:39 AM0 commentsViews: 1

05 जुलै

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपला जोरदार झटका बसल्यानं भाजपच्या गोटात सध्या चिंतेचं वातावरण आहे. पदवीधर मतदार हा भाजपचा पारंपरीक मतदार असल्याचा समजही यामुळं पुसला गेलाय. कोकण पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या नवख्या निरंजन डावखरेने भाजपच्या मातब्बर संजय केळकरांचा केलाला पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय.

केळकरांच्या पराभवाने भाजपची 20 वर्षांची सत्ता गेली. वसंतराव डावखरेंनी मुलाच्या विजयासाठी मातोश्रीवरच्या आपल्या प्रेमाचा पुरेपूर वापर केला आणि मातोश्रीच्या आदेशाने पडद्याआडून मदत केली गेली आणि त्याचा फटका भाजप उमेदवाराच्या पराभवात झाला. तर मुंबई शिक्षक मतदार संघात कपिल पाटील यांनी आपली जागा राखत दुसर्‍यांदा बाजी मारली. तीथंही मनीषा कायंदे या भाजपच्या बंडखोर उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा देत भाजपच्या विरोधाला आपण किंमत देत नाही असं दाखवून दिलं आणि भाजप तीसर्‍या स्थानावर फेकला गेला.

close