कळणे मायनिंगवर कारवाई कधी ?

July 5, 2012 3:22 PM0 commentsViews: 24

05 जुलै

सहा महिने झाले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे मायनिंगवर बेकायदा खनिज उत्खनन केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याचं दिसून येतंय. कोल्हापूर खनिकर्म विभागाने पहिल्यांदा डिसेंबर 2011 मध्ये केलेल्या तपासणीत कळणे मायनिंगमधून मोठ्या प्रमाणात बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं पुढे आलं होतं.

पण या अहवालावर कोणतीही कारवाई होत नसल्याचं लक्षात येताच आयबीएन लोकमतने आवाज उठवून हा अहवाल जनतेसमोर आणला होता. त्यानंतर खुद्द खनिकर्म राज्यमंत्री सचिन अहीर यांनीही 15 दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. पण आता त्याला दीड महिना होत आला तरी कळणे मायनिंगवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही.

त्यामुळे प्रशासनावर खाणमालकांना पाठीशी घालणार्‍या राजकीय नेत्यांचा दबाव असल्याच कळणेचे ग्रामस्थ म्हणात आहे. दरम्यान, नागपूर आणि कोल्हापूर खनिकर्म विभागाने 4 ते 7 मे रोजी केलेल्या पुनर्तपासणीतही या मायनिंगमधून बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं निष्पन्न झालंय.

हा अहवालही शासनाला तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांना सादर केला गेलाय पण तरीही याबाबत प्रशासनानेही कोणातीही कारवाई केलेली नाही. कळणे मायनिंग बंद करा या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांसह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतली.

close