टीम अण्णांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

July 5, 2012 11:07 AM0 commentsViews: 2

05 जुलै

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीम येत्या 25 जुलैपासून जंतरमंतरवर उपोषण करणार आहे. मात्र या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे टीम अण्णांनी उपोषण करुनच राहणार असा पवित्रा घेतला आहे. टीम अण्णांचे सदस्य अरंविद केजरीवाल,शांती भूषण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग,प्रणव मुखर्जी, पि. चिदंबरम, शरद पवार, कपिल सिब्बल यांच्यासह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र या चौकशीला कोर्टानं नकार दिलाय. चौकशी झालीच पाहिजे यामागणीसाठी टीम अण्णांचे सदस्य 25 जुलैपासून बेमुदत आंदोलन करणार आहे.

close