IBN लोकमत इम्पॅक्ट: व्हिजिलन्स पथक बरखास्त

July 5, 2012 11:03 AM0 commentsViews: 35

05 जुलै

कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्याच्या उदात्त हेतूनं 2010 साली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हिजिलन्स पथक निर्माण केलंय. या पथकाच्या सदस्यांबरोबर गेली तीन वर्षं प्रवीण कलमे ही व्यक्ती बेकायदेशीरपणे फिरत असल्याचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने या बातमीची दखल घेत हे व्हिजिलन्स पथकच बरखास्त केलंय. तसेच या पथकाचे प्रमुख शशिकांत वैराट यांच्याकडे असलेला भांडुपच्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभारही काढून घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

उद्योगांवर बेकायदेशीर धाडी टाकणार्‍या कलमेचा पर्दाफाश

close