अक्षरनंदन शाळेवर गदा ;4 वर्ग बंद करण्याची नोटीस

July 5, 2012 4:43 PM0 commentsViews: 3

05 जुलै

पुण्यातचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मातृभाषेतून शिक्षण देणारी आणि शिक्षण क्षेत्रातला वेगळा प्रयोग म्हणून अक्षरनंदन शाळेचं नावं घेतलं जातं. पण याच शाळेतील 7 वी ते 10 च्या सुमारे 160 विद्यार्थ्यांच्या करियरवर पुणे महापालिकेनं टाच आणली आहे. शिक्षण मंडळासाठी या शाळेतले 4 वर्ग ताबडतोब खाली करण्याचा फतवा महापालिकेनं शाळा प्रशासनकडे धाडला आहे. याविरोधात नारळकर फाऊंडेशन चालवत असलेल्या शाळा प्रसासनाने पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली आहे.

अक्षरनंदन शाळेचे 4 वर्ग ताबडतोब खाली करा कारण ते शिक्षण मंडळाला पाहिजेत असा सुलतानी फतवा महापालिकेनं शाळा प्रशासनाला धाडला. एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना नवनवीन अभिनव शैक्षणिक प्रयोग करणार्‍या शाळेच्या दीर्घ मुदतीचा करार करा या मागणीला कचर्‍याची टोपली दाखवून एका माननीय आमदारांच्या हट्टापायी इंग्रजी शाळा बांधण्याचा घाट घातला जातोय अशी चर्चा आहे. नारळकर फाऊंडेशन चालवत असलेल्या शाला प्रशासनानं पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडलीय. विद्यार्थ्यांनीही पालिकेला साकडं घातलंय.

सध्या शाळेची बालवाडी ते 6 वी अशी इमारत 99 वर्ष करारानं सुरू आहे. क्रीडांगण आणि 6 ते 10 वीची इमारतही शाळा दीर्घ करारानं मागतंय. भाडंही भरायची तयारी आहे पण शिक्षण मंडळाला मात्र मराठी शाळेचा बळी देऊन ंग्रिजीचा वरवंटा का फिरवायचाय आणि महपालिकाही शिक्षण मंडळाच्या कारभाराला का संमती देतंय हे अनाकलनीय आहे. या शाळेतील पालकांनी वेळ पडली तर रस्त्यावक यायचा इशारा दिलाय.

close