औरंगाबादमध्ये अनाथालयातील मुलीवर सामुहिक बलात्कार

July 6, 2012 12:58 PM0 commentsViews: 4

06 जुलैऔरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरात अनाथ आश्रमातून बेपत्ता झालेल्या मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ख्रिश्चन मिशिनरीच्या विद्यादीप या आश्रमातून बुधवारी पहाटे दोन मुली गायब झाल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी बुधवारी रात्री उशीरा परत आली. पण दुसरी मुलगी परत न आल्यामुळे शोधशोध सुरु केला. मात्र दुसर्‍या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

14 वर्षांची अनाथ मुलगी सामुहिक बलात्काराची बळी ठरलीये. औरंगाबादमधल्या छावणी परिसरातल्या विद्यादीप अनाथलयातून या मुलीचं बुधवारी रात्री अपहरण करण्यात आलं. आणि त्यानंतर गारखेडा परिसरात, माजी डिवाएसपी एस.के.शर्मांच्या घरी सलग दोन दिवस चार जणांनी या मुलीवर बलात्कार केला. या नराधमांमध्ये एक जण या डीवायएसपीचा मुलगा होता.

या प्रकरणी किशोर शर्मा, नंदू शिरसाठ, आनंद नागलोद आणि किरण चाबुकस्वार यांना अटक करण्यात आलीये. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचं अपहरण करायला मदत केली ती याच अनाथालयातल्या वर्षा भारती नावाच्या मुलीनं. त्यांहून धक्कादायक बाब म्हणजे.. निवृत्त डीवायएसपीच्या पत्नी जयश्री शर्माही या कटात सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वर्षा आणि जयश्री या दोघींनाही प्रवीण राठोडसोबत अटक करण्यात आलीये.

या सामूहिक बलात्कार प्रकरणात आई, मुलगा आणि त्याचे मित्र सहभागी असल्यानं हे सेक्स रॅकेट आहे का याचा पोलीस तपास घेत आहेत.

close