ऋषी राज सिंग यांच्या बदलीला भाजपाचा विरोध

July 6, 2012 11:41 AM0 commentsViews: 12

06 जुलै

सीबीआयचे अँटी करप्शन ब्युरोचे जॉईंट डायरेक्टर ऋषी राज सिंग यांची काल अचानक बदली करण्यात आली. याचे तीव्र पडसाद आता उमटू लागलेत. महाराष्ट्र भाजपने ऋषी राज सिंग यांच्या बदलीला विरोध केला आहे. याप्रकरणी पंतप्रधान आणि केंद्री गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी भाजपनं केली आहे. ऋषी राज सिंग यांच्याकडे आदर्श सोसायटी प्रकरणाची चौकशी होती त्यामुळे या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कालच सीबीआयनं आदर्श प्रकरणात चार्जशीट दाखल केलीय. या सर्व चौकशीत ऋषी राज सिंग यांचा महत्त्वाचा वाटा होता. सिंग यांची बदली आता आर्थिक गुन्हे शाखेला करण्यात आलीय. या बदलीबाबत संशयाचं वातारवण निर्माण झालंय. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते संदीप शेट्टी या बदलीविरोधात कोर्टात जाणार आहेत.

close