येडियुरप्पांनी घेतली सदानंद गौडांची विकेट

July 7, 2012 11:40 AM0 commentsViews: 1

07 जुलै

कर्नाटकातील भाजपमध्ये नेतृत्वबदलावरून सुरु असलेल्या तिढ्यावर अखेर तोडगा निघाला आहे. मुख्यमंत्री सदानंद गौडा हे आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या जागी येडियुरप्पा समर्थक जगदीश शेट्टर यांची नियुक्ती केली जाणार आहे. सदानंद गौडा यांनी राजीनामा द्यायची तयारी दाखवली आहे. जगदीश शेट्टार हे लवकरच ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जावं यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकला होता. त्याचाच एक भाग म्हणून येडियुरप्पा यांच्या समर्थक मंत्र्यानी राजीनामे दिले होते. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वात खळबळ उडाली होती. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी मोठी धावपळ सुरु झाली. पण येडियुरप्पा आणि त्यांच्या समर्थकांच्या पवित्र्याला अडवाणी यांनी विरोध केला होता. पण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपला गौडा यांचा राजीनामा घ्यावा लागलाय.

कोण आहेत जगदीश शेट्टर ?

कर्नाटक भाजपमधील ज्येष्ठ नेतेकर्नाटक सरकारमध्ये वजनदार मंत्री बी. एस. येडियुरप्पांचे कट्टर समर्थक कर्नाटक विधानसभेचे माजी सभापतीअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वपूर्ण जबाबदारीहुबळीतून विधानसभेवर सलग चारवेळा वर्णी1996 : कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड1999 : विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

close