एमईटी प्रकरणी आर्थिक शाखेला कोर्टाचा आदेश

July 6, 2012 12:27 PM0 commentsViews: 2

06 जुलै

एमईटी संस्था गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करणार की नाही याबाबत आर्थिक गुन्हे शाखेनं 8 दिवसात म्हणणं मांडावं असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. संस्थेचे माजी सदस्य सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं हे आदेश दिले आहेत. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष सुनिल कर्वे यांनी एमईटीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ट्रस्ट मध्ये कोट्यावधींचा गैरव्यवहार केल्याची तक्रार फेब्रुवारी महिन्यात ईओडब्ल्यू (EOW) कडे दिली होती. मात्र, यासंदर्भातला एफआयआर आजपर्यंत नोंदवण्यातच आला नाही. तसेच एमईटी मधल्या आर्थिक गैरव्यवहारांची, क्रिमीनल ब्रीच ऑफ ट्रस्ट या तक्रारींची चौकशी देखील ईओडब्लुनं केली नाही. वारंवार संपर्क साधुनही या यंत्रणेनं कोणाताच प्रतिसाद न दिल्यानं कर्वे यांनी कोर्टात धाव घेतली. ईओडब्लुनं चौकशी करावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली.

close