व्यंगचित्र वगळण्यास एनसीईआरटीच्या अध्यक्षांचा विरोध

July 7, 2012 12:21 PM0 commentsViews: 4

07 जुलै

युजीसीचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या समितीने एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकामधून व्यंगचित्र वगळण्यात यावी अशी शिफारस केली. पण थोरात थोरात समितीच्या निर्णयाला एनसीईआरटीचे अध्यक्ष प्रविण सिंक्लर यांनी विरोध केला आहे. डॉ.सुखदेव थोरात समितीचा हा निर्णय अयोग्य असून व्यंगचित्र वगळण्याला कुठलाच आधार नाही असंही ते म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्रावरून वाद झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने युजीसीचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा समिती नेमली होती. त्या समितीनं गांधी घराण्याची आणि इतर अशी 43 व्यंगचित्र वगळण्याची शिफारस केंद्राकडे केली होती. अनेक शिक्षणतज्ञांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आता खुद्द एनसीईआरटीच्याच अध्यक्षांनी निर्णयाला विरोध केल्याने हा वाद आणखी चिघळणार आहे.

close