गोदावरीच्या पात्रात हजारो मासे मृतावस्थेत आढळले

July 6, 2012 12:32 PM0 commentsViews: 11

06 जुलै

नाशिकमध्ये प्रदुषणामुळे गोदावरी नदीपात्रात हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहे. गंगापूरजवळ असलेल्या आसारामबापू पुलाजवळ हे मासे मृतावस्थेत आढळल्याने गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रदुषणाविरूध्द विविध सामाजिक संस्था आवाज उठवत होत्या. शहरातीलं सांडपाणी आणि एमआयडीसी (MIDC) मधल्या उद्योगांचं पाणी कुठलीही प्रक्रीया न करता थेट नदीत सोडल्यामुळे गोदावरीला सध्या गटाराचं स्वरूप मिळालंय. 2014 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

close