तळेगाव दाभाडे येथे स्त्री अर्भक सापडले

July 7, 2012 12:10 PM0 commentsViews: 54

07 जुलै

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे कोटेश्वर वाडीत एक दिवसाचे स्त्री अर्भक आढळून आले आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षण खात्याच्या केंद्रीय शस्त्रास्त्र भांडाराजवळ राहणार्‍या गीता सुनील केदारी वय 30 यांना सकाळी शेतात लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. या महिलेला एक दिवसाचे मुलगी चिखलात माखलेली आढळली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आले आहेत. दरम्यान, या मुलीला दत्तक घेण्यासाठी अनेक पालकांनी तयारी दाखवली आहे.

close